कामोठे:(4KNews)
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती – कामोठे अंतर्गत वाढत्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागल्याबाबत वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींना अनुसरून, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी अतिक्रमण पथकाने मोठी मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान कामोठे परिसरातील एकूण ११ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर या गाड्या JCB द्वारे तोडण्यात आल्या, अशी माहिती प्रशासनाने दिली.
ही कारवाई प्रभाग अधिकारी श्री. सुबोध ठाणेकर व प्रभाग अधीक्षक श्री. दशरथ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण पथक प्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, शहरात स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी अशा कठोर उपाययोजना सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
