कामोठे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आज सकाळी सुषमा पाटील हायस्कूल येथे वाहतूक विभाग आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीस वाहतूक विभागाचे अधिकारी श्री. अजय भोसले, श्री. साठे, श्री. मांडरे तसेच पनवेल महानगरपालिका प्रभाग ‘क’ चे अधिकारी श्री. सुमेदसाहेब उपस्थित होते. बैठकीत कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

🛣️ मुख्य निर्णय व उपाययोजना:
1️⃣ कोनीय पार्किंगची (Angular Parking) व्यवस्था:
कामोठे प्रवेशद्वार ते मानससरोवर कॉम्प्लेक्स (मनमोहन स्वीट) या मार्गावर वाहतूक विभाग कोनीय पार्किंग व्यवस्था करणार असून, रस्त्यावरील मार्किंगचे काम महानगरपालिका करणार आहे.
2️⃣ संध्याकाळी “No Parking Zone”:
कामोठे प्रवेशद्वार ते पोलीस स्टेशन चौक या रस्त्यावर संध्याकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत No Parking Zone म्हणून सक्त अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी, अशी विनंती नगरसेवक श्री. विजय चिपळेकर यांनी केली.

3️⃣ अतिक्रमणावरील कारवाई:
महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावरील हातगाड्या, आइसक्रीम गाड्या आणि इतर अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
4️⃣ Odd-Even पार्किंग योजना:
मनमोहन स्वीट ते सेंट्रल बँक चौक आणि सेंट्रल बँक चौक ते विस्टा कॉर्नर या रस्त्यांवर Odd-Even Parking पद्धत लागू करण्यात येईल.


5️⃣ इतर रस्त्यांवरील पार्किंग नियोजन:
संत तुकाराम मंदिर ते ऐश्वर्या हॉटेल, LG कॉर्नर ते दुधे कॉर्नर आणि विस्टा कॉर्नर या रस्त्यांवर समांतर पार्किंग की सम-विषम पार्किंग लागू करायची यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
6️⃣ मुदत संपलेल्या व बेवारस वाहनांवर कारवाई:
महापालिका अशा वाहनांवर लवकरच कारवाई करणार आहे.
7️⃣ सायलेन्सरचा त्रास देणाऱ्या बाईक रायडर्सवर नियंत्रण:
रात्रीच्या वेळी कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या बाईक रायडर्सविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक विभागाला 📞 8655354132 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा फोटो पाठवावा.
8️⃣ शाळा बसेससाठी पार्किंग नियम:
विद्यार्थ्यांना सोडून दिल्यानंतर शाळा बसेस रस्त्यावर पार्क न करता शाळेच्या मैदानातच ठेवाव्यात, यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल.
9️⃣ फेरीवाल्यांसाठी आरक्षित क्षेत्राचा वापर:
फेरीवाल्यांना त्यांच्या आरक्षित क्षेत्रात हलवून मुख्य रस्ते मोकळे ठेवण्यासाठी प्रशासन सक्त पावले उचलणार आहे.
बैठकीच्या शेवटी समाजसेवक श्री. सुरेश खरात यांनी वाहतूक विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिका कर्मचार्यांचे समस्त कामोठेकरांच्या वतीने आभार मानले.
