नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या मागणीला यश; पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांचे आश्वासन

4k समाचार
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या मागणीला आज यश आले असून, पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आजच्या बैठकीत आश्वासन दिले आहे . 


            

शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळाचे पनवेल अमरधाम स्मशानभूमीच्या दुरवस्थेचे चर्चा व फोटो सहीत महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले . यात पनवेल शहराच्या वेशीवरती (जुन्या मुंबई-पुणे रस्त्यालगत) असलेली अमरधाम स्मशानभूमीच मृतावस्थेत आहे असे खेदाने नमूद करून पनवेल नगरपरिषदेच्या स्थापनेपासून अस्तित्वात असलेली वास्तू आज प्रचंड दुरवस्थेत आहे. महापालिका प्रशासनाचा आणि एकंदर बेजबाबदारपणाचा शिवसेनेने आज निवेदनासहीत निषेध केला. 

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सदर विषय सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा असल्याचे मान्य केले. या अनुषंगाने चंद्रशेखर सोमण,  सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार कुळकर्णी , उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहर संघटक सुजन मुसलोंडकर, सिद्धेश खानविलकर, खंडेश धनावडे, प्रभाग १८ चे विभाग प्रमुख शाम देशमुख इ. कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत स्मशानभूमीतील पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, शवदाहिन्यांची अंतर्गत दुरवस्था, प्रकाश व्यवस्था, बंद पडलेले इन्व्हर्टर, स्वच्छता फवारणी, लहान मुलांची दफनभूमी, फाटलेले सूचनाफलक, इतस्तः पसरलेले बेवारस सामान, इ. बाबतीत स्मशानभूमीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे असे नमूद करून दुरवस्थेचे काही प्रातिनिधिक फोटो चर्चेदरम्यान प्रत्यक्ष सादर केले. 

या सर्व गैरसोयी दूर करण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रशासक या नात्याने आपण तातडीचा २५ लाखांचा निधी मंजूर करावा व इतर गैरप्रकार टाळण्यासाठी महानगरपालिकेने थेट नियंत्रण ठेवून दिवसरात्र सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी ही तातडीची मागणी या चर्चेदरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.यावर आयुक्तांनी महानगर क्षेत्रातील साधारणात ७१ च्या वर स्मशानभूमींचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असताना, पनवेल शहरातील ही मुख्य स्मशानभूमी कशी काय दुर्लक्षित झाली असा प्रश्न शहर अभियंता संजय कटेकर यांना विचारला. 

त्याचप्रमाणे पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांनी आयुक्त चितळे यांना सविस्तर निवेदन सादर केले. आयुक्त मंगेश चितळे यांनी हा विषय प्राधान्याने हाती घेणार असल्याची खात्री देताना इतर शहरातल्या काही निवडक स्मशानभूमींची पाहणी करून नागरिकांच्या लोकभावनेचा आणि श्रध्देचा आदर करण्यासाठी काही आधुनिक पध्दती किंवा यंत्रणा अंत्यसंस्काराच्या वेळी कार्यान्वित करता येतील काय याचीही चाचपणी करण्याचे ठोस आश्वासन चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top