नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लाखो रुपये किमतीच्या १९ मोबाईलचा सिईआयआर पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना केले हस्तांतरण

4k समाचार
पनवेल दि. ११ ( संजय कदम  ) : चोरीस गेलेल्या लाखो रुपये किमतीच्या १९ मोबाईलचा सिईआयआर पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना आज हस्तांतरण केले .
  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  सिईआयआर   पोर्टचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामाना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आला होता.

त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे, हद्‌दीतील गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 19 मोबाईलचा सिईआयआर   पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना हस्तांतरण करण्यात आले .  पोलीस आयुक्त मिलींद भारंबे,अपर पोलीस आयुक्त, संजय येनपुरे,  पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3. पनवेल  प्रशांत मोहीते. सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दतील चोरीस / हरविलेले मोबाईल फोन याबाबतची तकार नोंदविण्यासाठी नागरीकांना भारत सरकार व्दारे सिईआयआर  पोर्टल सुरू करण्यात आले आहे. 

पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे, दिलेल्या सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, यांचे मदतीने पोशि भिमराव खत्ताळ यांनी विविध राज्यातुन आतापर्यंत एकुण ९१ मोबाईल फोनची अंदाजे २.६६.०००/- रूपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे 

.तसेच यापुर्वी  सिईआयआर  पोर्टल व्दारे ७७ मोबाईल एकुण अंदाजे ९.२४.००० /- रूपये किंमतीचे असे आजपावोतो ९६ मोबाईल अंदाजे किंमत ११.५२.००० /- रूपये किंमतीचे मोबाईल शोधुन मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरीकांनी जनमानसांतील पोलीसांची प्रतिमा उंचावल्याबाबत पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे नागरीकांनी विशेष उल्लेख करून आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top