नवीन बातम्या
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर
जागतिक आदिवासी दिन उरण मध्ये उत्साहामध्ये संपन्न
साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा
कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती
खारघरमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून १.६४ कोटींचा ऐवज लंपास
शटर उचकटून मध्यरात्री धाडसी चोरी; सोने, हिरे, प्लॅटिनमचे दागिने आणि रोकड चोरीला, पोलिसांचा तपास सुरू
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बाळा कुंभार साहेब यांनी पदभार स्विकारल्यानंतर पनवेल शहर हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

4kNews कामोठे दि. 11

महिन्याभरात नागरी समस्या न सोडविल्यास प्रहार संघटनेचे पालिकेला बेमुदत उपोषण करण्याचा दिला इशारा !!
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार संघटनेनी वेळोवेळी पालिका आयुक्त यांना निवेदन देत नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली होती, परंतु पनवेल पालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना न केल्याने प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत त्यांचा सोबत चर्चा केली व नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवले नाही तर पालिकेला बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. 

यात प्रमुख मागण्या आहे की, पनवेल शहरात रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे तत्काळ बुजविणे व ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, पनवेल पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यंना गणवेश व साहित्य तत्काळ देणे, पनवेल शहरातील आदिवासी वाडी व पाडे इथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खारघर मधील धामोळे येथे आदिवासी लोकांसाठी तत्काळ स्मशानभूमी उभारणे, पालिकेने लोकसहभागकरीता तत्काळ प्रभाग क्षेत्र सभा सुरू करणे, अतिरिक्त अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांवर कायदेशीर कारवाई करणे, पनवेल शहरातील सर्व अनधिकृत मोबाइल टॉवर काढणे व थकीत २०० कोटींची मालमत्ता कर वसूल करणे, शासन नियमानुसार दर तीन वर्षांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्काळ बदल्या करणे, 

पनवेल पालिका क्षेत्रातील अनाधिकृत आणि बेकायदेशीर फेरीवाले यांच्यावर कारवाई करणे, पालिकेच्या वादग्रस्त अधिकारी जितेंद्र मढवी यांचे तत्काळ निलंबन करणे आदी प्रमुख मागण्यांकरिता प्रहार संघटनेने नागरी समस्या संदर्भात पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेत लेखी निवेदन देत चर्चा केली व पनवेल शहरातील नागरी समस्या तत्काळ न सोडविल्यास प्रहार संघटनेच्या वतीने पनवेल पालिकेच्या विरुद्ध बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड यांनी दिली आहे. तसेच नागरी प्रश्नांबाबत पनवेल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व बेमुदत उपोषणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रहारच्या वतीने डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड, ऐड. मनोज टेकाडे, अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना, ऐड. अजय तापकीर संपर्क प्रमुख कोकण, अजय कदम, अभिनव येलवे, राहुल तेलंग, पंकज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top