नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

*कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेची आढावा बैठक*




4kNews कामोठे

पनवेल, दि. 22 : पनवेल महानगरपालिका हद्दीत मलेरिया, डेंग्यू यांसह कीटकजन्य आजारांचा प्रभावी प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक आज दि.19ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली. 



या बैठकीस उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’ सभापती रविंद्र भगत, प्रभाग समिती ‘ब’ सभापती मधू पाटील, प्रभाग समिती ‘क’ सभापती रविंद्र जोशी, प्रभाग समिती ‘ड’ सभापती अजय बहिरा, महापालिका सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



यावेळी महापौर नितीन पाटील यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी विशेष स्वच्छता व सखोल साफसफाईच्या मोहिमा राबवाव्यात. रिकामे भूखंड, बांधकामस्थळे तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचे नियमित सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धूरफवारणी व स्वच्छता मोहिमा राबविताना संबंधित प्रभागातील महापालिका सदस्यांचे सहकार्य घ्यावे. साथीचे आजार पसरणार नाहीत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.



सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी पावसाळ्यात निर्माण होणारी डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्याठिकाणी जंतुनाशक व अळीनाशक फवारणी वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.



विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी साथीचे आजार पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.महापालिकेच्या वतीने कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. बैठकीच्या सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top