नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा मुंबईत राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न



4kNews कामोठे दि.22
पनवेल – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 




या पुरस्कार सोहळ्याला दैनिक पुढारी मुंबई आवृत्तीचे संपादक राजेश नाईक,केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल,विश्वस्त गणेश कोळी,
युयुत्सु आर्ते,प्रदेशाध्यक्ष एड.विठ्ठल मोघे,सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,सदस्य अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते. 



या पुरस्कारात आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नांदेड येथील दैनिक स्वतंत्र वार्ताचे कार्यकारी संपादक कालिदास अंनतोजी,संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार रत्नागिरी येथील वरिष्ठ पत्रकार मकरंद भागवत,पांडुरंग भटकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार बुलढाणा चिखली येथील श्याम देशमुख,हेमंत कुलकर्णी मराठी संपादक पुरस्कार या नावाने दिला जाणारा यंदा परभणी पूर्णा येथील नागनाथ नागठाणे,मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक पुरस्कार युवराज धनवडे दै.पुण्यनगरी कोल्हापूर, नवीन सोष्टे स्मृती मराठी वार्ताहर पुरस्कारासाठी अकोला येथील बाळकृष्ण नेरकर,मधु रावकर शहर वार्ताहर पुरस्कारासाठी ठाणे येथील महादेव माने,जयानंद मठकर पुरस्कार पुणे येथील अमरसिंग परदेशी,शरददादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार राजू रणवीर तर दलित मित्र रमाकांत आरते पुरस्कार रायगड येथील सुभाष पाटील तर राज्यस्तरीय दर्पण प्रेरणा पुरस्कार परभणी येथील मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक सत्यजित गावंडे, याशिवाय जीवन गौरव पुरस्कार मालाड येथील निसार अली सय्यद तर पनवेल येथील संजय कदम या दोघांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top