नवीन बातम्या
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

पनवेल पालिका हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्नाबाबत प्रहार संघटनेची पालिका आयुक्तसोबत बैठक संपन्न !!.

4kNews
पनवेल / दि 29 पालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी आयुक्तांचे पालिका प्रशासनाला आदेश !!
प्रहार संघटनेने पनवेल शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्याबाबत पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांची भेट घेत नागरी समस्या सोडवण्यासाठी निवेदन देत नागरी प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास प्रहार संघटने तर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्या अनुषंगाने दिनांक २६/०५/२०२६ रोजी प्रहार संघटनेची पनवेल मधील जनतेच्या प्रलंबित मागण्यासाठी मा. मंगेश चितळे ( पालिका आयुक्त) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 

यावेळी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व मागण्यांच्या अनुषंगाने येत्या महिन्याभरात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिल्याची माहिती डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिली. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने मा. महेश मेघमाळे ( अतिरिक्त आयुक्त ), मा. कैलास गावडे ( उपायुक्त मुख्यालय ) , मा. आनंद गोसावी ( मुख्य वैदकीय अधिकारी ) , मा. संजय कटेकर ( शहर अभियंता ) , मा. विलास चव्हाण ( उप अभियंता पाणी पुरवठा ) , मा. संजय बोडके ( मुख्य अग्निशमन अधिकारी ) तसेच प्रहार संघटनेच्या वतीने डॉ. सुनील शिरीषकर ( अध्यक्ष रायगड जिल्हा) , श्री. अजय कदम, श्री. राहुल तेलंग, श्री. पंकज मोहिते, श्री. अभिनव येलवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top