पनवेल दि. १० ( संजय कदम ) : पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने पळस्पे , पुष्पक नगर व उसर्ली येथे टाकलेल्या धाडीमध्ये हजारो रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे .

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या विशेष पथकाने पळस्पे , पुष्पक नगर व उसर्ली येथे टाकलेल्या धाडीमध्ये हजारो रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( ई ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
