4k समाचार
पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : तालुक्यातील डेरीवली येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकाचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपनयन करण्यात आल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे .

कु. सनी शिवाजी पाटील (वयं १६ वर्षे ९ महिने) राहणार रूम नंबर ३०३ पवितर निवास डेरवली ,वर्ण- सावळा, उंची ५.४ इंच , केस काळे वाढलेले, बाधा सडपातळ असून अंगात नेसून राखाडी रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट, पायात चप्पल, मराठी भाषा बोलतो याचे कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरिता त्यांचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण केले आहे . याबाबत पुढील तपास पोउपनि बाळासाहेब फड हे करीत आहेत .
