4k समाचार
उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक)संलग्नच्या झालेल्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या युनियनमध्ये एचपीसीएल (आर), एचपीसीएल (एमकेटी), बीपीसीएल(आर आयएफ), बीपीसीएल (एमएकेटी), व्हिडाॅल, रिलायन्स, टाईटवाॅटर,लुब्रीझाॅल, महानगर गॅस, ओएनजीसी या कंपन्या येतात.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तसेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ५ ) मुंबईतील टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला.अभ्यासू व दांडगा जनसंपर्क असलेले किरीट पाटील हे गेली ३५ वर्ष बीपीसीएलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी उरणच्या युनिट सेक्रेटरी पदी काम केले आहे. नंतर त्याची डेप्युटी जनरल सेक्रेटरी पदी निवड झाली. तेथे उत्तम काम करत असताना गेल्या तीन वर्षांपूर्वीच जनरल सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले होते.

त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांची सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पष्टवक्ते, सहकार्य, सेवाभाव असलेला स्वभाव हा त्यांच्या यशाचे कारण आहे. त्यांचे गुरुवर्य महेंद्रशेठ घरत यांनी केलेले मार्गदर्शन त्यांच्यासाठी मोलाचे ठरले आहे. महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आज मी आत्मसन्माने जगत आहे,

त्यांच्यामुळेच विविध पदांवर आणि विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली असे किरीट पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या.यावेळी त्यांचा मुंबईतील तेल रसायन भवन येथे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.किरीट पाटील हे एनएमजीकेएस संघटनेच्या उपाध्यक्षपदीही कार्यरत आहेत. ते इंटक रायगड जिल्हाध्यक्ष व रायगड कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत.
