नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

उरणमध्ये बिबट्याची दहशत; पावलांचे ठसे व बकऱ्यांवर हल्ला

4kNews दि. 10

उरण तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींची चाहूल लागली आहे. पाणदिवे, कोप्रोली डोंगरातील निळी खान तसेच छोटे धरण परिसरात बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळून आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तम म्हात्रे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी परिसरात तपास केला असता पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात दिसून आले. 



दरम्यान, या हालचालींना वनविभागाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी संबंधित विभागाने तपास सुरू केला आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थांना रात्री अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचे, पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याची वाढती हालचाल पाहता ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top