4kNews कामोठे
पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी
उरण, दि. 5 (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुखपदी (एचओडी) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उरणसह रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

या पदोन्नतीबद्दल डॉ. शेख यांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वासुदेवन पिल्लई, प्राचार्य डॉ. जगदीश डब्ल्यू. बाकल आणि फ्रनव पिल्लई यांचे आभार मानले. नवीन जबाबदारीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे तसेच संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शेख यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

