नवीन बातम्या
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश

4kNews कामोठे

उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले गेट बंद आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू होते.



आंदोलनाची दखल घेत कंपनी प्रशासनाने १९ स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना कामावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी १० जणांना दोन दिवसांत, तर उर्वरित नऊ जणांना नोव्हेंबर महिन्यात कामावर घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. या निर्णयानंतर आंदोलकांनी आनंद व्यक्त केला.
मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. पहिल्या दोन दिवसांत तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवले होते. अखेर तिसऱ्या दिवशी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.



या आंदोलनाला आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, भाजप युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी. एन. डाकी, उरण नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, कामगार नेते रवी घरत, मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.



दरम्यान, सर्व प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत बांधपाडा आणि ग्रामस्थ मंडळाचे संघटनेने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top