नवीन बातम्या
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !



4kNews कामोठे

स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
उरण दि. 31(विठ्ठल ममताबादे)  उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे बांधपाडा यांच्या माध्यमातून  सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना व स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
कंपनीच्या प्रकल्पांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देऊन त्यांना लोकल लेबर, सर्व्हेअर आणि हाऊसकीपिंगसारख्या विविध कामांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी संधी मिळाल्यास परिसरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात येत आहे.




कंपनीमध्ये सुरू होणाऱ्या रोजगार-व्यवसायाच्या संधींमध्ये ७/१२ धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, अशी दुसरी महत्त्वाची मागणी करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकरी कुटुंबांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये योग्य स्थान मिळावे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे.
या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीच्या ठिकाणी  मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेट बंद आंदोलन होणार आहे. संबंधित कंपनी व्यवस्थापनाने या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  सथानिक रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार का ? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top