नवीन बातम्या
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार


पनवेल, दि.१ ( वार्ताहर) : पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना नुकताच ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. 


स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय कदम यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाला पनवेल महानगराध्यक्ष निलेश कांबळे, पनवेल तालुकाध्यक्ष दिलीप नाईक, तालुका उपाध्यक्ष नरेश परदेशी, महिला आघाडी अध्यक्षा ममताज पठाण, संघटक भारत दाताड, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष जावेद मास्टर, करंजाडे विभागाध्यक्ष ईश्वर ओव्हाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय कदम हे पनवेल तालुक्यातील निर्भीड आणि धाडसी पत्रकार म्हणून परिचित आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या पत्रकारितेत दिसून येतो. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध विषयांना त्यांनी स्थानिक तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आहे.


दिनदलित, गरीब तसेच अन्याय-अत्याचाराला बळी पडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता संबंधित घटनांचा पाठपुरावा करून त्या राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top