नवीन बातम्या
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन

4kNews कामोठे
पनवेल, दि.१ (प्रतिनिधी) : पनवेलमधील १४५ एकरांच्या गोदरेज सिटी टाउनशिपमध्ये ‘ऑन कोर्ट’ या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल सुविधांपैकी एक असलेल्या या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची चार कोर्ट्स आहेत. या उद्घाटन सोहळ्यास जागतिक क्रमवारीतील अव्वल पॅडेलपटू आर्टुरो कोएलो आणि ऑगस्टिन तापिया यांच्यासह उद्योग, मनोरंजन व क्रीडा क्षेत्रातील १०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. 



पॅडेलपार्क इंडियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या केंद्रातील कोर्ट्स स्पर्धात्मक सामने तसेच नियमित खेळासाठी तयार करण्यात आले आहेत. गोदरेज सिटीतील ९-होल गोल्फ कोर्स आणि हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे येथे विविध क्रीडा व जीवनशैली सुविधांचा समावेश झाला आहे.



दरम्यान, गोदरेज सिटीमध्ये तीन व चार बेडरूमच्या स्काय व्हिलांचा नवीन टप्पाही जाहीर करण्यात आला. हे व्हिला गोल्फ कोर्स व पॅडेल कोर्ट्सच्या जवळ असून, आरोग्य व सक्रिय जीवनशैलीला पूरक सुविधांवर भर देण्यात आला आहे.
पॅडेल खेळाला भारतात वाढता प्रतिसाद मिळत असून, उच्च दर्जाच्या सुविधांमुळे या खेळाची लोकप्रियता आणखी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास गोदरेज प्रॉपर्टीजच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top