4k समाचार दि. 5 ५ दिवसांपूर्वी त्यांच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नखाने त्यांना ओरखडा लागला. त्या कुत्र्याचे नियमित रेबीज लसीकरण होत असल्यामुळे आणि कुत्र्याने चावलेले नाही, फक्त नख लागले आहे, असे समजून वनराजभाईंनी दुर्लक्ष केले. पण त्यांना रेबीज झाला. त्यानंतर ते अहमदाबादमधील अतिशय महागड्या केडी हॉस्पिटलमध्ये ५ दिवस दाखल होते. पण जसे मी म्हटले तसे […]
कामोठेमध्ये “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” महाआरोग्य शिबीराचे आयोजन …
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने “सेवा समर्पण पंधरवाडा” उपक्रमाअंतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाला मा. नगरसेवक दिलीप पाटील, माँ नगरसेवक अरुणकुमार भगत, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनिल (भाऊ) गोवारी, सगरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे, तालुका उप […]
लाडकी बहिण’ योजनेतील बदलांवर महिलांचा संताप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
4k समाचार दि. 23 ‘ हिंगोली – ‘लाडकी बहिण’ योजनेतील बदलांमुळे अनेक महिलांना १५०० रुपयांचा मासिक लाभ मिळेनासा झाल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष न ठेवता सर्व पात्रांना लाभ देण्यात येत होता. मात्र जूनपासून नवीन निकष लागू झाल्याने अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तपोवन गावातील महिला बालविकास अधिकाऱ्यांना […]
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; परतीचा मान्सून उशिराने होणार
4k समाचार दि. 23 महाराष्ट्र – यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परतीच्या प्रवासावर असलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची […]
नव्या जीएसटी दरांचा मद्यावर परिणाम नाही; मात्र पुढे दरवाढीची शक्यता
4k समाचार दि. 23 २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी स्लॅबनुसार देशभरात आता फक्त ५% आणि १८% असे दोनच कर टप्पे राहणार आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी मद्यप्रेमींना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दारूवर अद्याप जीएसटी लागू नसून ती राज्य सरकारांच्या आबकारी कराखालीच येते. मात्र, सरकारने आणलेल्या ४०% विशेष करश्रेणीत तंबाखू, सिगारेटसह आलिशान […]
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; अनेक गावे जलमय, ५ जणांचा मृत्यू
4k समाचार दि. 23 मराठवाडा – रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत केले आहे. परंडा, पाटोदा, शिरूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत असताना, काही ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसत […]
सोलापूर शरद पवारांना करमाळ्यात मोठा धक्का
4 k सामाचार दि. 23 सोलापूर – पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाण्याची घोषणा केली आहे. सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावून पाटील यांनी यापुढील निवडणुका शिंदे गटासोबत लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या या भूमिकेमुळे […]
दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाची मागणी..
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेकडून सिडको व पोलिसांना निवेदन, २६ सप्टेंबरला धरणे आंदोलन.
पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे. संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर […]
सर्वपित्री अमावस्येला खड्ड्यांचे श्राद्ध – नागरिकांची अनोखी हाक!
कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच […]
पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ओबीसी […]