4k समाचार दि. 23 ‘
हिंगोली – ‘लाडकी बहिण’ योजनेतील बदलांमुळे अनेक महिलांना १५०० रुपयांचा मासिक लाभ मिळेनासा झाल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष न ठेवता सर्व पात्रांना लाभ देण्यात येत होता. मात्र जूनपासून नवीन निकष लागू झाल्याने अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तपोवन गावातील महिला बालविकास अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आल्या असता त्यांनी या बदलांविषयी नाराजी व्यक्त केली.
महिलांनी आरोप केला की, “निवडणुकीपूर्वी सर्व बहिणी ‘लाडक्या’ होत्या, पण आता आम्हाला ‘सावत्र बहिणी’ बनवले जात आहे.”
