4k समाचार दि 23
पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंगवर अवलंबून आहे असे सुसंस्कृत डिजिटल नेटिव्ह आहेत. किंमत तडजोड: काही विशिष्ट व्यापाऱ्यांपुरते मर्यादित रिवॉर्ड्स, ऑप्टिमायझेशनच्या प्रयत्नात रिडेम्प्शनच्या मार्गांनी मर्यादित खरेदी, यावर उपायसुविधा म्हणून प्रथम क्रेडने अनुरूप, सुसंगत समग्र सेवा सुरू केली. यामध्ये ऑनलाइन शॉपिंग वर जास्त रिवॉर्ड्स आणि क्रेड इकोसिस्टम मध्ये सोपे विनाअडथळा रिडेंप्शन मिळते.

बहुतांश क्रेडिट कार्डधारक कुठे शॉपिंग करायचे आणि पॉइंट्स कसे वापरायचे यावर प्रभाव टाकणाऱ्या गुंतागुंतीच्या नियमांनुसार वागतात. पण क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्डधारक आपल्या पसंतीच्या ठिकाणी खर्च, कमाई आणि रिडेंप्शन करू शकतात. कार्डधारकांना सर्व ई-कॉमर्सवर केलेल्या खर्चावर 5% इतके पॉइंट्स आणि ऑफलाइन व्यवहारावर पॉइंट्स मिळतात. त्यामध्ये क्रेड स्कॅन अँड पे याचाही समावेश आहे. हे पॉइंट्स ते क्रेड इकोसिस्टम मध्ये रिडीम करू शकतात. त्यामध्ये खास कार्डधारकांसाठी बनवलेली नवीन फ्लाइट्स आणि हॉटेल्स उत्पादनेही आहेत.

क्रेडचे संस्थापक कुणाल शाह म्हणाले, “क्रेडिट साठी योग्य असलेल्या लोकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. नवीन क्रेड क्रेडिट कार्ड प्रोग्राम प्रत्येक ऑनलाइन खर्चाला स्व प्रकटीकरणाचे रूप देतो. त्यामध्ये रिवॉर्ड्स हे अटींवर नाही तर पर्याय, निवडीवर आधारित आहेत. इंडसइंड बँकेच्या कंझ्युमर बँकिंग अँड मार्केटिंगचे कंट्री हेड सौमित्र सेन म्हणाले, “इंडसइंड–क्रेड भागीदारी ही अगदी स्वाभाविक, नैसर्गिक आहे. याचे कारण दोन्ही ब्रँड्समध्ये नाविन्यपूर्णता, अनोखेपणाचे वैशिष्ट्य आणि प्रीमियम अनुभवांचा डीएनए आहे. एनपीसीआय ग्रोथच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सोहिनी राजोला म्हणाल्या, “रुपे भारताच्या डिजिटल-फर्स्ट ग्राहकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पेमेंट अनुभव तयार करण्यास बांधील आहे. क्रेड इंडसइंड क्रेडिट कार्डचे सादरीकरण हे या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे ज्यामध्ये लवचिकता, तात्काळ रिवॉर्ड्स आणि सोपे रिडेंप्शन दररोजच्या वापरामध्ये येते.
