4k समाचार दि. 25
ठाणे / कल्याण :
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने मनसेवर मोठा घाव घातला आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

याआधी उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले होते. मात्र आता राज ठाकरे यांच्या मनसेलाही शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असून, शिंदेंची ही चाल राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
