4k समाचार दि. 25
नवी मुंबईतील कल्याण शीळ रोडवर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर घालत रविवारी मध्यरात्री एक मोठा दिशा दर्शक फलक रस्त्यावर कोसळला. यामुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते राजू पाटील आणि पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करून पडलेला फलक बाजूला काढण्याची व्यवस्था केली. सुदैवाने, या घटनेत एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
