नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर कामगारांना आधार वाटणारा एकमेव नेता महेंद्रशेठ घरत



उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
JNPT स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्त, शेतकरी,कष्टकऱ्यांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि.बा पाटील साहेबांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्याचे काम केले. परंतु पाटील साहेबांच्या निधनानंतर मशरूम सारख्या उगवलेल्या कामगार संघटना व्यवस्थापनांच्या ताटाखालचे मांजर बनून स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. JNPT मधील सफाई कामगार,स्पीडी मल्टीमोटर्स मधील सर्व कामगारांना राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या रूपाने एकमेव आशेचा किरण दिसत आहे 

त्यामुळे त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे. स्पीडी मल्टीमोटर्स सोनारी या कंपनीचा JNPT बरोबरच्या कराराची मुदत संपत आहे. येथे सात संघटना असल्यामुळे एक -दोन संघटनांना हाताशी धरून बाकीच्या कामगारांना वेठीस धरण्याचे काम स्थानिक व्यवस्थापन करत आहे, त्यामुळे सर्व कामगार एकत्र होवून महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. JNPT मधील कंत्राटी सफाई कामगारांच्या दोन युनियन असल्यामुळे व्यवस्थापन त्याचा गैरफायदा घेवून त्यांना वाटेल त्या प्रमाणे वागवत  आहे. 

या सर्व कामगारांनी सुद्धा दोन्ही युनियन झिडकारून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. DPW मधे सुरुवातीला महेंद्रशेठ घरत यांची युनियन होती त्यावेळी स्थानिकानाचं नोकरीत प्राधान्य दिले जायचे परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणुकी वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांची युनियन तोडली.परंतु तेव्हा पासून परप्रांतीयांची भरती सुरु झाली व स्थानिक कामगारांवर अन्याय होवू लागला. याची जाणीव DPW च्या कामगारांना होवून त्यांनी पुन्हा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.दि.बा. पाटील साहेबांनंतर स्थानिक कामगारांना राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हेच आशेचा किरण दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top