4kNews कामोठे 12
पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी नुकतीच शिवसेना महिला संपर्क संघटिका म्हणून नियुक्ती झालेल्या निधीताई शिंदे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी निधी शिंदे यांनी महिला संघटन मजबूत करणे, नवीन महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, मतदार नोंदणी तसेच शिवसेना सभासद नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाप्रमुख दीपक निकम, शिवसेना पनवेल महानगरपालिकेतील गटनेत्या लीना गरड आणि सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
बैठकीस शिवसेना नगरसेविका रितिक्षा गोवारी व मेघना घाडगे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

