नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

*गव्हाण गावाच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा*
“”प्रितम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्ती”


4k समाचार दि. 17
   गव्हाण गावाला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी आज गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून, सिडको प्रशासनाने आजपासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.



मोर्चादरम्यान, गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भात येत्या ५ ते ६ दिवसांत सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे.



समस्या आणि पार्श्वभूमी
नवी मुंबई आणि उलवे नोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाण गाव हा त्याचा एक भाग असूनही विविध मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. गावाला दररोज सुमारे 6 लाख लिटर पाण्याची गरज असताना, पाणी कमी दाबाने आणि अपुर्‍या प्रमाणात सोडले जात होते..



मोर्चाची सुरुवात आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली. या वेळी ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोर्चाला भाजप नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाज नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजू कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.



चर्चा व निकाल
मोर्चा मार्गस्थ होण्याआधी सिडकोचे सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्री.प्रितम म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सखोल चर्चेनंतर, सिडको प्रशासनाने गव्हाण गावाला आवश्यक पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले. तसेच, कायमस्वरूपी तोडगा म्हणून हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याच्या मागणीवर येत्या काही दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले. तात्पुरता स्थगिती निर्णय
सिडकोकडून तातडीच्या पाणीपुरवठ्याच्या आश्वासनानंतर आणि पुढील चर्चेची खात्री मिळाल्यानंतर, सदरचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top