नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान.





4k समाचार
उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मानसन्मान व्हावा. त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा, न्याय मिळावा या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा (नवदुर्गांचा )सन्मान करण्यात येतो. याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून रँकर्स अकॅडमी,कोप्रोली चौक, उरण येथे नवदुर्गांचा  सत्कार सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला.




सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिया सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्त्या समिधा म्हात्रे, गट शिक्षणाधिकारी निर्मला घरत यांच्या हस्ते श्री गणेश पूजन झाले.प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला.समिधा निलेश म्हात्रे (सामाजिक क्षेत्र ), डॉ.जागृती म्हात्रे (वैद्यकीय क्षेत्र ), तृप्ती भोईर (पत्रकारिता ), हेमांगी नरेश म्हात्रे (शेतकरी क्षेत्र),निर्मला नरेश  म्हात्रे (आशा वर्कर ), हर्षाताई लीलाधर ठाकूर (स्वच्छता कर्मचारी ),ऍडवोकेट माधवी पाटील (न्यायदान क्षेत्र ), निर्मला मच्छिंद्रनाथ घरत  (शिक्षण क्षेत्र ), अपर्णा अंकित म्हात्रे  (पोलीस प्रशासन )या नवदुर्गांचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, साडी देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले . 

सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नवनाथ म्हात्रे (कोप्रोली )यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सचिव प्रेम म्हात्रे, सह सल्लागार कुमार ठाकूर, सदस्य माधव म्हात्रे, प्रणित पाटील, ओमकार म्हात्रे, साहिल म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, सुरज पवार, निवेदक नवनाथ म्हात्रे यांनी व संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.दरवर्षी नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, सुप्रिया मुंबईकर, प्रतीक मुंबईकर, समिधा मुंबईकर यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. एकंदरीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top