पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः करंजाड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांच्या भेटीमध्ये खा.श्रीरंग बारणे यांनी दिले.

प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने करंजाडे मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करत असून यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथे भेट घेतली. यावेळी यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनुयायी आयु. कुणाल लोंढे, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे आयु. दिगंबर साळवे आयु. धनंजय ताटे, गणेश डोळस, नितीन कांबळे, उपस्थित होते.

या संदर्भात खा.श्रीरंग बारणे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांनी सिडकोचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्या समवेत लवकरच बैठक लावण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले आहे.
