पनवेल/प्रतिनिधी — ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कोपर येथील आर 4 येथील बळीराम धर्मा पाटील व शंकर धर्मा पाटील यांच्या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दत्त जयंतीनिमित्त कोपर येथील प्लॉट 221 आर 4 येथील अपेक्स बिल्डिंगमध्ये बळीराम धर्मा पाटील, शंकर धर्मा पाटील व पाटील कुटुंबाकडून दरवर्षी दत्त जयंती मोठया उत्साहाने साजरी करतात. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी कोपर गावाचे पुनर्वसन झाले आहे. या बद्दल्यात आर 4 येथे विस्तापित केले आहे

. यठिकाणी पाटील कुटुंबानी एकत्रित येत दुर्गा माता मंदिराची स्थापना केली. यावेळी दत्त गुरूंची देखील स्थापना केलेली आहे. यावेळी येथील मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्ताने दत्त मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परंपरेप्रमाणे मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक, आरती, महापूजा यासह जन्मकाळ सोहळा, आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक प्रथेप्रमाणे पहाटे ५ ते ६ वा.च्यादरम्यान दत्तमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. अभिषेकानंतर गुरूंची महापूजा व आरती करण्यात आली. दुपारी बाराच्या दरम्यान आरती व दिवसभर भजन, कीर्तन व अन्य धार्मिक सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी दत्त मंदिरात दिवसभर धार्मिक उपक्रम पार पडले असल्याची माहिती बळीराम पाटील यांनी दिली.
