नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

*लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*


पनवेल दि.२७(वार्ताहर) रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लब च्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी येत्या शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.


  आजच्या धावपळीच्या युगात.. वाढणारी  वाहनांची वर्दळ… होणारी ट्रॅफिक.. आणि त्यावर नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलीस हे नेहमीच उन्हातानात रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असतात..पण वेळेची देखील मुभा असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे शक्य होत नसते.. त्याचबरोबर देशाचा चौथा आधारस्तंभ हा देखील समाजासाठी दिवस रात्र झटत असतो..

आणि या पत्रकारांना देखील स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो यालाच अनुसरून मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश जी देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, मेडी. डायरेक्टर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट चे प्रसिद्ध नेत्रचिकिस्तक डॉक्टर सुहास हळदीपुरकर,

पनवेल वाहतूक शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे याचबरोबर भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर या कार्यक्रमासाठी  विशेष उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर , मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे हे उपस्थित असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top