पनवेल दि.२७(वार्ताहर): करंजाडे वसाहतीमध्ये समाजसेवक आयु कुणाल लोंढे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने करंजाडे वसाहतीमध्ये गतिरोधक बंधने व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचे काम सुरु झाले आहे.

करंजाडे वसाहतीमधील सेक्टर १ ते ६ या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी सदर ठिकाणी गतिरोधक उभारणे , झेब्रा क्रॉसिंग आणि फलक लावणे आदी कामे महत्वाची होती. या बाबत समाजसेवकी आयु कुणाल लोंढे यांनी सिडको कार्यक्रारी अभियंता यांच्याकडे पत्र व्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल सिडके घेत प्रत्यक्ष कमला सुरुवात केली आहे.
