अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित नवरात्रौत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद


4k समाचार दि. 25
गुळसुंदे गावातील अभिनव सामाजिक विकास मंडळ आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदा उत्सवाचे १६ वे वर्ष असून मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

सकाळ-संध्याकाळ आरती, तसेच सांस्कृतिक उपक्रमांमुळे वातावरणात उत्साहाचे व भक्तिरसाचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळत आहे.उत्सवाच्या काळात गरबा-दांडिया, विविध स्पर्धा, विशेष कार्यक्रम, तसेच मुलांसाठी उपक्रम अशा अनेक आकर्षणांची रेलचेल आहे. गावातील नागरिकांसह परिसरातील भाविकही या उत्सवात सहभागी होत असून गुळसुंदे गाव भक्तीमय वातावरणाने नटले आहे. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा उत्सव यशस्वी आणि उत्साहात साजरा करण्यासाठी महिला वर्ग परिश्रम घेत आहेत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top