4k समाचार
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दूरवस्थेबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने अमरधाम स्मशानभूमीच्या कंत्राटदाराची सदोष व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सविस्तर निवेदन दिले होते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी स्वतः लक्ष घालण्याचे ठोस आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. परंतू याबाबत महापालिकेच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तातडीने कारवाई करावी अन्यथा शिवसेना पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
