नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून केला खुन; पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक तासात आरोपीला अटक

4k समाचार
पनवेल दि.२६ (संजय कदम) : सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली.  


करंजाडे से. ५ पोलीस चौकी समोर जाणाऱ्या रोडला एक ४७ वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची माहिती फोनद्वारे पोलीस हवालदार माधव शेवाळे यांना बातमीदाराने दिली. त्यानंतर लगेचच पोलीस हवालदार माधव शेवाळे यांनी बातमी वरिष्ठांना दिली. दरम्यान दिवसपाळी कर्तव्या करिता असलेले पनवेल शहर पोलीस ठाणे बिट मार्शलचे पोहवा विलास कारंडे व पोहवा राजेंद्र केणी यांनी घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी नागेश काळे (वय ३२) हा पळून जाण्याच्या बेतात असताना ताब्यात घेतले. मयताचे त्याच्या चुलत भावाचे पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे कारणावरुन आरोपी नागेश वाल्या काळे याने त्याचा मयत भाऊ दत्तु वाल्या काळे, वय ४५ वर्षे याचे डोक्यात दगड घालुन त्याची हत्या केली. आरोपी नागेश काळे याचे विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top