4k समाचार
पनवेल दि. ३१ ( वार्ताहर ) : लोकमान्य टिळकांनी अभिप्रेत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गणेश उत्सवात सर्वात उच्च स्थानावर असलेले पनवेल मधील गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे तुकाराम कोळी परिवार यांनी या वर्षी “रक्तबीज वध” या देखाव्यात रंगत आणलेली आहे.

हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तुकाराम कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट श्री साई आर्टस् कल्याण, रमेश जाधव, गणेश जाधव यांची आहे. तसेच पडदा पेंटींग रमेश डुकरे, निवेदक, अथर्व गोडबोले तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी, सुरज भोईर, नवीन पनवेल यांनी साकारल्याची माहिती मदन तुकाराम कोळी व कोळी कुटूंबियांनी दिली .
फोटो – तुकाराम कोळी यांचा गणेशोत्सव
