नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’




4k  समाचार दि. 1

पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळाने तर महिला गटात कर्जतच्या शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. 


  यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक जयंत पगडे, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. 
  पुरुष गटात द्वितीय क्रमांक सुरताल भजन मंडळ नारंगी, तृतीय क्रमांक श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघरने तर उत्तेजनार्थ पारितोषिक अलिबागच्या स्वरविहार भजन मंडळाने पटकावले. यामध्ये उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे कुणाल पाटील आणि उत्कृष्ट तबला वादक भूषण गायकर ठरले. महिला गटात द्वितीय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ दुन्द्रेपाडा, तृतीय क्रमांक श्री. सद्गुरूकृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरळ यांनी पटकाविले. उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून कै. वैयजंती माता भजन मंडळ रसायनीचे ओमकार तराळे तर आई एकविरा भजन मंडळाचे रोहन पाटील उत्कृष्ट तबला वादकचे मानकरी ठरले. 


        लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या मंडळाला प्रत्येकी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले. 


 या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पुरुष गटातून ३६ तर महिला गटातून ३० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून पुरुष गटातील अंतिम फेरीसाठी श्री सद्गुरू वामनबाबा प्रासादिक भजन मंडळ सिद्धी करवले, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघर, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वलप, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गव्हाण, सुरताल भजन मंडळ नारंगी, जय श्री राधे गोविंद भक्ती समूह कामोठे, शारदा संगीत भजन मंडळ विचुंबे, स्वरविहार भजन मंडळ अलिबाग, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ अंजप, श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ म्हसळा, श्रीराम वरदायिनी भजनी मंडळ उलवे, श्री सिद्धेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ आवास, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वावंजे, गावदेवी प्रासादिक भजन मंडळ पेंधर, 

श्री गंगादेवी भजन मंडळ अलिबाग तर महिला गटात श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ खारघर गाव, आई एकविरा महिला भजन मंडळ दुन्द्रेपाडा, कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ ओवेपेठ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाजे, श्री सद्गुरू कृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली, कै. वैजयंती माता भजन मंडळ सावळे, सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे मजकूर, श्री विश्वविजयनाथ सुहास्य संगीत विद्यालय उरण, ओमसाई भजन मंडळ खरसुंडी, नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा, शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ कर्जत, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरळ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ खोपोली, राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ वावंजे, आणि ओंकार संगीत भजन मंडळ नेरळ या भजन मंडळांची निवड झाली होती. दोन दिवस चाललेल्या या भजन स्पर्धेत भजन मंडळांनी आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या भजन स्पर्धेच्या आयोजनामुळे भजन मंडळ व कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top