उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांना पनवेल तालुक्यातील एक मोठा धक्का ,
उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील शिवसेना शिंदे गट जाहीर प्रवेश केला.

उबाठा गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील यांनी अनेक पदाधिकार्यांसह काल रात्री उपमुखंमंत्री एकनाथ शिदें यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत यावेळी यांच्यासह विभागातील असंख्य पदाधिकार्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गेली अनेक वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष असा प्रवास केला होता, उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले.

दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हाच सोडून दिले असून कार्यकर्त्यांला येणार्या अडचणींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. फक्त मी आणि माझे कुटूंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात. त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोकं पक्ष सोडून गेले. आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळेतालुका अध्यक्ष रघुनाथशेठ पाटील यांचे पक्षात स्वागत करत यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
