नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेलमध्ये स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात

4k समाचार दि. 28
पनवेल :
पनवेल शहरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था स्वरसंस्कार संगीत विद्यालय याचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील कला, संस्कार आणि क्रीडा क्षेत्रात भक्कम पायाभूत कार्य करण्याच्या उद्देशाने ‘संस्कार प्रतिष्ठान’ या नव्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. 



मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे व्यवस्थापक मा. संदीप वाळके, गुरुवर्य प्रसाद सुतार, प्रतिभा कुलकर्णी, अॅड. किशोर धाकड, मा.नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांसह सुधीर कांडपिळे, रवी नाईक, अॅड. चंद्रकांत मढवी, नासिर खान सर, छाया अक्कलकोटे, रायगडभूषण अॅड. सूरज गोंधळी,अॅड. विशाल डोंगरे, अॅड संदीप बटवाल,मा.शेखर भुजबळ अशा मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.



विद्यार्थ्यांचे सुरेल आणि लयबद्ध सादरीकरण
वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरू होऊन रात्री ९:३० वाजेपर्यंत रंगला. जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन, सुगम संगीत, तबला, पेटी, गिटार वादन, भरतनाट्यम तसेच पाश्चात्य नृत्य अशा विविध कलाप्रकारांची रंगतदार सादरीकरणे करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम इतका मनमोहक झाला की संपूर्ण वेळ प्रेक्षकांना ना कंटाळा आला ना थकवा जाणवला.

संस्थेच्या संस्थापिका अॅड. सुरेखा भुजबळ यांचे योगदान

स्वरसंस्कार संगीत विद्यालय आणि नव्याने स्थापन झालेले संस्कार प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संस्थापिका म्हणून अॅड. सुरेखा भुजबळ यांचे योगदान विशेष अधोरेखित करण्यात आले. पालकवर्ग व मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करत, “मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कला-संस्कृती जपणे आणि क्रीडा तसेच संस्कारांचा संगम साधणे ही त्यांची मोठी कामगिरी आहे,” अशा शब्दांत गौरव केला.



संस्थेचे पाठीशी उभे राहणारे खरे सूत्रधार
संस्थेच्या यशामागे अॅड. प्रशांत भुजबळ यांचे मोलाचे योगदान असल्याचा उल्लेख मान्यवरांनी विशेषतः केला. ते सदैव पाठीशी उभे राहून संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला दिशा देतात, व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हे सर्व कार्य शांतपणे पार पाडणारे “पडद्या मागचे खरे सूत्रधार” असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.



संस्कार प्रतिष्ठानचा उद्देश
आजच्या धावपळीच्या युगात व मोबाईल संस्कृतीच्या प्रभावामुळे कमी होत चाललेली सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी आणि मुलांच्या मानसिक-शारीरिक तंदुरुस्तीकरिता कला व क्रीडा क्षेत्रात संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.
गायन, वाद्यसंगीत, नृत्य, झुंबा, चित्रकला, अबॅकस यांसारख्या कलांबरोबरच तायक्वांडो व जिमनॅस्टिक्ससारख्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक देणार आहेत.

पनवेलकरांसाठी सुवर्णसंधी
संस्कार प्रतिष्ठान हे एकाच छताखाली कला व क्रीडा क्षेत्रातील दर्जेदार प्रशिक्षण माफक शुल्कात उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पनवेलकरांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, “अॅड. सुरेखा भुजबळ आणि अॅड. प्रशांत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top