नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर  यांच्या शोकसभेत नागरिकांना अश्रू अनावर.



4k समाचार
उरण दि २8 (विठ्ठल ममताबादे )
जन्माला आलो जगण्यासाठी आपण जगून दाखवूया आपल्या नंतर आपलं कोणीतरी चांगलं नाव काढेल असं काहीतरी करूया जे पेराल तेच उगवेल माणूस जसा विचार करत असतो तसा तो पुढे घडत  असतो आपण सकारात्मक विचार केला तर  आपल्या बाबतीत सकारात्मक घडत असते जर नकारात्मक विचार केला तर  मग  वाईट घडत असते आपल्याला खूप थोडे आयुष्य  लाभले आहे पण त्या आयुष्यात आपण केलेले चांगले कर्म हे चिरंतन  आठवण आपली करून देत असतात हे विचार तंतोतंत लागू पडतात ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर यांना.निमित्त होते  जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडियम स्कूल आवरे चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी अशोक ठाकूर यांच्या शोकसभेचे. स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या शोकसभेचे आयोजन आवरे विद्यालयात करण्यात आले होते. सुरुवातीला अशोक ठाकूर यांच्या पवित्र स्मृतीस उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अशोक ठाकूर यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक व कौटुंबिक कार्याचा आढावा शोक सभे मध्ये उपस्थित शोकाकुलजनाने केला. यात पुढे प्रामुख्याने  अशोक ठाकूर  यांनी आपल्या मातृभूमीत  शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याच पवित्र काम केले.

त्यांनी स्कुलची स्थापना करून मातृभूमित शिक्षणाची मुहूर्तमेढ सुरू केली.त्यांनी शैक्षणिक प्रवास संपुर्ण रयत  शिक्षण संस्थेत केला व व्यावसायिक विद्यार्जन सुध्दा रयत शिक्षण संस्थेत केले.एकविरा या संस्थेच्या अंतर्गत नऊ दिवस नवरात्र भरवीत असत.आवरे  शिव भोलेनाथ मंदिरात नवीन मंदिरासाठी नवीन कौल देऊन धार्मिक कार्यात सहभाग दर्शविला.ठाकूर सर एक थोर शिवभक्त होते सामाजिक तेची जाणीव करत आवरे खाडी  स्वतः लिलाव करून,घेऊन किंवा प्राणीमात्रासाठी कशाप्रकारे पाण्याची साठवण होईल याबद्दल त्याचा विचार करून गाळ काढून व्यवस्थित रित्या पाणपोईची व्यवस्था केली. माणुसकीचा महासागर प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात आठवण करून देईल  अशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार हे दिसत आहे या पाठीमागे अशोक ठाकूर सर यांची शिस्त दिसून येते अतिशय प्रेरणादायी  विद्यार्थ्यांवर असणारे संस्कार हे बरच काही सांगुन जातात  आयुष्य हे थोडेच  आहे जगणं थोडं पण आपण केलेल्या सामाजिक कार्याचा आरसा  अशोक ठाकूर यांनी सर्वा समोर ठेवला आहे आयुष्य क्षणभंगुर आहे आयुष्यात कधी कोमेजून जाईल याचा पत्ता नाही कधी कुणाचा शेवट येईल ते सांगता येणार नाही  कोरोना सारख्या महामारी च्या काळात अनेक शिक्षण संस्था व पालक विद्यार्थी वर्गाला  वेठीस धरत असताना  अशोक ठाकूर यांनी एक धाडसी निर्णय घेत  सन २०२०- २०२१ या  शैक्षणिक वर्षात शाळेतील ३१८ विद्यार्थ्यांची वार्षिक शैक्षणिक ही  माफ केली. कोरोना कालावधीत पालक वर्गासाठी मोठा दिलासा  मिळालं स्वत: रयत सेवक असताना शिक्षिकीपेशा सांभाळून  उभारलेल्या वास्तू कडे तितकेच प्रेरणे लक्ष देण्यासाठी यांसाठी त्यांनी शिक्षण सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली.  

शिक्षण हे
कठीण परिस्थितीत शिक्षण पुर्ण  केल्यानंतर अशोक ठाकूर यांनी जन्मगावी आवरे येथे रामचंद्र म्हात्रे  विद्यालय सुरु केले.सुरुवातीला विद्यार्थ्यांना विद्यार्जन केले.तसेच आवरे गावात अशोका कोचिंग क्लासेस नावाने गणित व इंग्रजी विज्ञान या विषयाचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. बारावी विज्ञान शाखेत सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथेमॅटिक्स हे आपल्या जन्मगावी आवरे व उरण येथे क्लासेस घेत असत अशी प्रतिक्रिया, मनोगत सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी शोकसभेत व्यक्त केले.शोक सभेसाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या शोक संदेशात अशोक  ठाकूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.अशोक ठाकूर हे कसे प्रेरणादायी होते व उत्तम होते याचे उदाहरण त्यांनी सर्वासमोर ठेवले. या प्रसंगी उपस्थित असलेले संतोष पवार यांनी शैक्षणिक मदत म्हणून संस्थेस दरमहा दोन हजार पाचशे रुपये देण्याचे ठरवले आहे. 

या कार्यक्रमास उपस्थित शोकाकुल मान्यवर प्रकाश पाटील, संतोष पवार, सुनील वर्तक, निलेश गावंड,धीरेंद्र ठाकूर,एस टी म्हात्रे ,भगत सर, प्रदीप वर्तक, मयूर गावंड, सुनील गावंड व विद्यालयातिल विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.या शोक सभेसाठी  सूत्रसंचालन कौशिक ठाकूर यांनी केले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वर्तक यांनी केले.आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी स्वर्गीय अशोक  ठाकूर यांच्यावर स्नेह व्यक्त करणारा सर्व स्तरातील हितचिंतक वर्ग  उपस्थित होते.तसेच ठाकूर यांच्या  कुटुंबातील सर्व सदस्य, जानकीबाई जनार्दन स्कूल आवरेचे शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग व अशोक ठाकूर यांचे स्नेही उपस्थित होते  शोक सभे समयी सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. अशाप्रकारे विद्येचा उपासक विद्येचा अनुयायी स्वर्गवासी अशोक ठाकूर यांची शोक सभा आवरे येथे विद्यालयात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top