शिवसेनेत विनोद साबळे यांची उरण विधानसभा प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती



उरण, रायगड | दि. 17 डिसेंबर २०२५
शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देण्यासाठी उरण विधानसभा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने श्री. विनोद सदाशिव साबळे (रा. उरण, जि. रायगड) यांची शिवसेना प्रभारी जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र – विधानसभा उरण) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
नियुक्ती पत्रात शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, श्री. विनोद साबळे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतील तसेच सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्षवाढीसाठी सक्रियपणे कार्य करतील.
या नियुक्तीमुळे उरण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top