नवीन बातम्या
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोरात


4kNews दि. 17
पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पनवेलमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच युतीच्या माध्यमातून समन्वय साधून काम करण्याच्या स्पष्ट सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. 



दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक तथा जिल्हा समन्वयक शिवदास कांबळे व पक्षाचे इतर पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदितीताई तटकरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सामावून घेत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवणार असून महिला व युवकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीमुळे पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top