4kNews कामोठे दि. 10
पनवेल प्रतिनिधी आदिवासी या नावातच जो आदी -आधी, राहणारा आहे तो आदिवासी या समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आमदार विक्रम पाटील यांनी सूतोवाच केले
जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त पनवेल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आदिवासी विकास परिषद’ आणि ‘अन्याय अत्याचार निर्मूलन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते .या कार्यक्रमास आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष ऍड मदन गोवारी , जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकतें निलेश सोनावणे ,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीषकर , अण्णा पंडित भीमशक्ती चे सुभाष गायकवाड बी पी लांडगे, संतोष चाळके आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी आपल्या मनोगतात पुढे बोलताना आमदार विकारणात पाटील यांनी मतदार संघात जिथे जिथे माझी गरज असेल तिथे ठ्ठे आपल्या सेव्हीसेसाठी सदैव तत्पर असले अशी ग्वाही देखील दिली .

कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष ऍड मदन गोवारी , सामाजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे , सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीषकर , अण्णा पंडित भीमशक्ती चे सुभाष गायकवाड बी पी लांडगे, संतोष चाळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महापुरुषाच्या प्रीतेमला पुष्प अर्पूण करण्यात आले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत विविध सरकारी योजना चा लाभ घेताना काही अडीअडचणी आल्यास संपर्क साधून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाठी नेहमीच मदत करीत राहील असे आश्वासित केले यावेळी माची प्रबळ येथील अटकेलेल्या पर्यटकांची सुटका करणाऱ्या आदिवासी बांधवांचा पोलीस प्रशासनाने सन्मान प्रशस्ती पत्रक देऊन करण्यात आल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे निलेश सोनावणे यांनी विशेष कौतुक केले पोलीस विभागाने आदिवासी बांधवानी केलेल्या साहसी कामाचा गौरव केला आणि त्यांना आज आदिवासी दिनानिमित्त प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान होत आहे यापुढे हि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन निलेश सोनावणे यांनी केले या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या समृद्ध संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले. या सोहळ्यातून पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी माची प्रबळ परिसरात भटकंतीदरम्यान अडकलेल्या २३ पर्यटकांची/नागरिकांची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुखरूप सुटका करणाऱ्या चार धाडसी आदिवासी बांधवांचा या प्रसंगी विशेष गौरव करण्यात आला. संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. आदिवासी समाजाचे हक्क, संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या प्रश्नांकडे समाज व प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि ‘जल, जंगल, जमीन’ या प्रश्नांसाठी लढा देणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचे स्मरणही या वेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास स्वतंत्र संपादक पत्रकार संघ चे अध्यक्ष नामदेव शेलार नगरसेवक शशिकांत शेळके उपस्तिथ होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष . संतोष चाळके, किरण शेटे, रमेश खिल्लारे, कु.राहुल गायकवाड,.रतन कडू .रामा चौधरी, रत्नदीप जोशी ,अमोल कांबळे, .जोमा निरगुडा .परेश लोंढे भास्कर मदे, अशोक चौधरी, सुनील भगत ,.राज भोईर.यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.मदन गोवारी तसेच सूत्रसंचालन बी.पी.लांडगे यांनी केले ..

