4k समाचार दि. 21
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरना पारधी (वय १६ वर्षे ८ महिने) असे या मुलीचे नाव असून तिचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे आहे – उंची सुमारे ५ फूट, गोरा रंग, गोल चेहरा, मजबूत बांधा. घटना घडली त्यावेळी तिने निळ्या रंगाचा टॉप आणि करड्या रंगाची लेगीस पॅन्ट परिधान केली होती. तिच्याकडे मोबाईल फोन असल्याची माहिती मिळाली आहे.

या मुलीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
