4k समाचार दि. 21
महाराष्ट्रातील आणखी एका तालुक्याचे नाव बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे
पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडनगरीला पुन्हा ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड तालुका’ करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारचे राजपत्र लवकरच जारी होणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, शिवप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राजगड किल्ल्याला प्रथम राजधानी म्हणून गौरव दिला, त्याच किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला वेल्हे तालुका आता राजगड या ऐतिहासिक नावाने ओळखला जाणार आहे.
