नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे वनवासी विद्यार्थांची आरोग्य तपासणी

4k समाचार
पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत गेली ३५ वर्षे  सातत्याने वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना राबविली जात आहे त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, मोफत औषधे वाटप, खाऊ वाटप, आणि तेथील १० वी च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे Ideal Study App चे वाटप करण्यात आले.  


  उपक्रमामध्ये रोटरी ची जुनी theme “Spreading Happiness” याचा प्रत्यय आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आंनद खरोखर  साठवून ठेवण्या सारखा होता.
प्रोजेक्ट चेअरमन डॉ. रमेश पटेल यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली तसेच अल्पोपहाराची खूप छान सोय केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. डॉ. तुषार जोशी, डॉ.चंद्रात्रे, डॉ. मिलिंद घरत यांनी विध्यार्थ्यांची तपासणी करून प्रोजेक्ट यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला. फार्मासिस्ट अँन लीना घोडिंदे यांनी रो. मनोज आंग्रे यांच्या सहकार्याने औषधे वाटप करण्याची जबाबदारी छान पणे पार पाडली. 

बी जी पाटील यांनी या प्रोजेक्ट बद्दल उपस्थितीताना माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. PP संतोष घोडिंदे यांनी आपल्या जुन्या आठवणी ना उजाळा दिला. अँनस यांनी खाऊ वाटपाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. दीपक गडगे आणि डॉ. मिलिंद घरत यांच्या हस्ते अँपचे वाटप करण्यात आले. रो .सुदीप गायकवाड रो .ऋषिकेश धुंदरे, रो .ऋषिकेश जोशीरो. गजानन जोशी, रो .विकेश कांडपिळे, रो.कचरे, सार्जंट योगेश महाजन यांना  दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली आणि नेहमीप्रमाणेच  या शिबिराचे सुयोग्य नियोजन PP डॉ. लक्ष्मण आवटे यांनी  केले. या प्रसंगी अध्यक्ष अनिल ठकेकर, सचिव अतिश थोरात, नियोजित अध्यक्ष दीपक गडगे यांचे सह अनेक अँन्स, अनेटस तसेच वनवासी आश्रम कार्यकर्ते श्री. गाडगीळ हे उपस्थित होते. आजच्या  सर्व सदस्यांच्या लक्षवेधक उपस्थितीने “Unite For Good “ही या रोटरी वर्षाच्या Theme चा पुनप्रत्यय आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top