पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेलजवळील भिंगारी गाव येथील सर्व्हीस रोडवर किया गाडीची एका इलेक्ट्रीक स्कुटीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात या गाडीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

इलेक्ट्रीक स्कुटी गाडीवरुन सचिन कोंडकर (37) व सुशिल पवार (28) हे भिंगार गाव येथील पनवेलकडे येणार्या सर्व्हीस रोडवरुन जात असताना एमएसईबी ऑफिसच्या जवळ आल्यावेळी समोरुन येणार्या किया गाडीवरील चालकाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
