पनवेल दि.२७(वार्ताहर): राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सदर महिलेचे नाव मुस्कान इक्बाल शेख (वय १९ वर्षे रा चिंध्रण) असून तिचा रंग गोरा, उंची ५ फुट, बांधा मध्यम, अंगात नेसून गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल घातलेली. सोबत काळया रंगाची बॅग, हिंदी मराठी भाषा बोलते सोबत एम. आय. कंपनीचा मोबाईल आहे.

या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन नं-०२२-२७४५२४४४, ९५९४७९५५७७ किंवा पोहवा धनाजी तांडेल यांच्याशी साधावा
