पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या सहकार्याने विनोद साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील, कमळाकर लबडे, मिरेंद्र शहारे, शुभम धारेराव, ज्वालासिंह देशमुख, सचिन कदम, दिनेश धामणसकर, प्रल्हाद कुंभार, किरण लबडे, सुहास थोरात, रमेश राठोड, रघुनाथ झुमरे, किरण साबळे, मयुर साबळे, अमोल साबळे, केतन निकम, ॠषभ शेळके, निवृत्ती मालुसरे आदींनी पक्ष प्रवेश केला आहे.
