पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या संस्थेने यंदा पाचव्या वर्षात पदार्पण केले असुन दिनांक 23 जुलै रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुणे व क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील आर . जे . शंकरा आय हॉस्पिटल च्या सेमिनार हॉलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला .

या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ अर्चना परेश ठाकुर तसेच सौ ममता प्रितम म्हात्रे यांचे आरती करून स्वागत करण्यात आले . तत्पश्चात मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सर्वांनी स्थान ग्रहण केले .
कार्यक्रमाची सुरुवात रिया मिरानी यांच्या सुंदर अशा गणेश वंदना व सरस्वती वंदना नृत्याने करण्यात आली . इनरव्हील प्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . क्लबच्या भूतपूर्व अध्यक्षा सौ प्रतिभा डांगी यांनी आपल्या स्वागतीय भाषणात उपस्थित मान्यवर , त्यांचा कार्यकाल उत्तमरीत्या पार पाडण्यात प्रामुख्याने सहभागी असलेले कार्यकारणी मंडळ, क्लबचे सदस्य तसेच परिवारातील सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व नवनिर्वाचीत अध्यक्ष व कार्यकारिणीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपल्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यांचे पीपीटी च्या माध्यमातून सादरीकरण केले.

यात त्यांनी मागील वर्षभरात विविध अनाथाश्रम व वृद्धाश्रमा ना दिलेली मदत ,विविध शाळा कॉलेजातील मुलांसाठी केलेली वेगवेगळ्या स्वरूपातील मदत , वैदयकीय मदत इ . अनेक अशा एकुण 59 उपक्रमांची माहिती दिली .
तत्पश्चात नवीन कार्यकारिणी अध्यक्षा सौ. सिंपल आचलिया यांना शिष्टाचारा प्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॉलर व पीन प्रदान करून क्लबचा कार्य भार सोपविण्यात आला. सर्व कार्यकारिणी मंडळाने हातात आपापल्या पोस्टनुसार बॅनर घेऊन संगीताच्या तालावर स्टेजवर उत्साहपूर्वक पदार्पण केले. त्यानंतर क्रमाने वाईस प्रेसिडेंट सौ. नम्रता बांठीया , आय पी पी सौ. प्रतिभा डांगी . सेक्रेटरी सौ .युक्ती शहा , खजिनदार सौ. ममता ठक्कर , आय एस ओ सौ. स्नेहल कल्याणकर , एडिटर सौ. मौसमी गोगुला, सीसी सौ. प्रिया चतुर्वेदी, प्रोजेक्ट चेअरमन सौ ध्वनी तन्ना , जॉईंट सेक्रेटरी सौ. वैशाली कटारिया , कार्यकारिणी सदस्य सौ. हेतल बालड, सौ. विजयता कोठारी, सौ. बिजल मिरानी या सर्वांचे देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पिनिंग करून पदग्रहण करण्यात आले. तसेच नवीन सदस्यांना क्लबच्या चार्टर अध्यक्षा सौ हेतल बालड यांच्या हस्ते शपथ देऊन त्यांचे क्लबमधे स्वागत करण्यात आले.

नवनिर्वाचित अध्यक्षा सौ सिंपल आचालिया यांनी सभागृहाला उद्देशून आपल्या भावना तसेच त्यांच्या कार्यकाळात समाज कार्या चा त्यांनी आखलेला आराखडा उपस्थितांसमोर मांडला. प्रमुख अतिथी सौ अर्चनाताईनी आपले मनोगत व्यक्त करून सौ सिंपल व क्लबच्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एडिटर सौ मौसमी गोगुला त्यांच्या कार्यकाळातील प्रथम बुलेटीन व सीसी सौ प्रिया चतुवैदी यांच्या फेलोशिप डायरीचे विमोचन करण्यात आले.
यावेळी दरवर्षीप्रमाणे जे प्रोजेक्ट केले जातात त्यात प्रामुख्याने पेन येथील “आई डे केअर” या मतिमंद मुलांच्या शाळेला सौं अर्चना ठाकुर , सौ. ध्वनी तन्ना, सौ स्नेहल कल्यानक र या तीन दानदात्यांच्या मदतीने तीन मुलांच्या वार्षिक शिक्षणाचा भार उचलण्याच्या हेतूने रु 45000 /- चेकस्वरूपात देण्यात आले. तसेच आर .जे .शंकरा हॉस्पिटलला उषा कंपनीचे शिलाई मशीन सौ. विजयता कोठारी यांच्याकडून देण्यात आले जेणेकरून हॉस्पिटलच्या शिवणकामासाठी बाहेर होणारा खर्च वाचून तो गरजूंच्या इलाजासाठी वापरता येईल

पर्यावरणाला अनुकूल असा आणखी एक क्लबचे लोगो छापलेला कापडी पिशव्या वितरणाचा तिसरा उपक्रम राबविण्यात आला ज्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला जाईल व क्लबचा प्रचार- प्रसार होण्यासही मदत होईल.
अंततः क्लबच्या वाईस प्रेसिडेंट सौ नम्रता बांठीया यांनी सर्व उपास्थित मान्यवरांचे , क्लबच्या सदस्यांचे तसेच सुत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल सौ ध्वनी व सौ जयश्री मंगलानी यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
