नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

मंत्रा क्रिकेट क्लब ‘रामशेठ ठाकूर कप’ अंडर १६ स्पर्धेचा विजेतादिलीप वेंगसरकर यांचे प्रभावी मार्गदर्शन; १२ संघांच्या सहभागाने स्पर्धेला मोठा प्रतिसाद



4kNews दि. 13
पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर आयोजित पहिल्या “रामशेठ ठाकूर कप” अंडर १६ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यंत रोमांचक झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या मंत्रा क्रिकेट क्लबने एमसीसी ठाणे संघावर मात करत स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले. 



स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून युवा खेळाड्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले कि,  दीर्घ खेळी करायला शिका, शिस्त, निष्ठा आणि निर्धार तुम्हाला यशाकडे नेतील त्यामुळे ही तीन गुणवैशिष्ट्ये तुम्हाला खेळात अधिक उंचीवर घेऊन जातील. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी संयम, सातत्य आणि सरावाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. 



वेंगसरकर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि सुरळीत आयोजनाबद्दल प्रशिक्षक अमित जाधव, किरण ठाकूर, पुंडलिक पोटेकर, संदीप पवार आणि कृष्णा बालू यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच सुंदर, खेळास पोषक अशा विकेट्सची निर्मिती केल्याबद्दल ग्राउंड्समनचेही त्यांनी अभिनंदन केले.या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला होता. युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, स्पर्धात्मक वातावरणात गुणांची कसोटी व्हावी आणि स्थानिक पातळीवर दर्जेदार क्रिकेट पुढे यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.स्पर्धेत गटसाखळी ते उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने मोठ्या उत्साहात पार पडले.

विजेत्या संघाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत उत्कृष्ट संघभावना दाखवली. अंतिम फेरीत मंत्रा क्रिकेट क्लबने प्रभावी गोलंदाजी आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर सामना आपल्या बाजूने खेचला.स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि व्यक्तिगत पुरस्कारांचे वितरण स्थानिक उद्योजक व क्रिकेटप्रेमी राजू गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सर्व खेळाडूंना प्रगतीपथावर अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले. पहिल्या वर्षीच “रामशेठ ठाकूर कप” स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयोजकांनी आगामी काळात ही स्पर्धा आणखी भव्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top