4kNews कामोठे दि. 5
पनवेल, दि. २ (वार्ताहर) : दिवाळीच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व असून, सुगंधी उटणे हा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा जपण्याबरोबरच नागरिकांमध्ये दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पक्षाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, भरत पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, विभागप्रमुख प्रवीण जाधव, प्रभागप्रमुख अमोल गोवारी, शाखाप्रमुख प्रवीण डावलेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

